रोजगारासाठी शेतकरी, शेतमजुरांचा कल परराज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:57+5:302020-12-23T04:14:57+5:30
कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात ...
कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात वाढ, कोरोनामुळे संसार कामधंदे सर्वांचीच घडी विस्कटली. कोरोना या संकटामुळे अनेकांना गावाकडे परत यावे लागले. यंदा शेतीने साथ दिली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले पाहावयास मिळत आहे. शेतीवर भरमसाठ खर्च मात्र उत्पन्न अत्यल्प आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नाही. किनवट तालुक्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने मजुरांच्या हाताला कामे नाहीत. घरी शेती आहे पण शेतीला पाणी नाही. सिंचनाचे कोणतेही साधन नसल्याने कोरोनाच्या काळात कामधंदा गेला. घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जबाजारी झाली. या वर्षी शेतीत पाहिजे असे काम नसल्याने कामे कमी खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण गावाकडे परतले आहेत. पण आता काम मिळेल की नाही याची खात्री नसल्याने गावांमध्ये रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शहराकडे किंवा तेलंगणात गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यावर्षी शेतीचे उत्पन्न मिळाले नाही. इकडून तिकडून उसनवारी घेऊन शेतीत घातलेले जे खर्च झाले तेही मिळाले नाही. पोटापाण्यासाठी कामधंदा केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे बसस्टँडवर गर्दी पहावयास मिळत आहे.