पोलिस दिसले अन् चोरट्याने धूम ठोकली; पाठलागानंतर शस्त्रधारी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:48 AM2023-03-24T11:48:33+5:302023-03-24T11:49:16+5:30

चोरीचा प्रयत्न फसला; शस्त्रासह चोरटा पोलिसांच्या गळाला

The armed thief was arrested after being chased in Kandhar | पोलिस दिसले अन् चोरट्याने धूम ठोकली; पाठलागानंतर शस्त्रधारी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

पोलिस दिसले अन् चोरट्याने धूम ठोकली; पाठलागानंतर शस्त्रधारी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

- मारोती चिलपिपरे 
कंधार :
शहरातील एका पेट्रोल पंपाजवळ चोरीचा प्रयत्न करण्यासाठी थांबलेल्या चोरट्याच्या नजरेत अचानक पोलिसांचा फौज फाटा पडला अन् चोरट्याने तेथून धूम ठोकली. पोलिसांनीही पाठलाग करून त्यास पकडले.  त्याच्याजवळ दोन खंजर आणि लोखंडी शस्त्र सापडले आहेत. हा सर्व प्रकार २२ मार्च रोजी पहाटे शहरातील महेश पेट्रोल पंपाजवळ घडला.

कंदार पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. एस. पडवळ, होमगार्ड सुरेश गीते, आदमपुरे व शेंडगे आदी कर्मचारी २१ मार्च रोजी रात्री  शहरात गस्त घालत होते. २२ मार्च रोजी पहाटे साधारणता पावणेचार वाजण्याच्या सुमारास महेश पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना पाहताच एक व्यक्ती पेट्रोल पंपाच्या पाठीमागून पळत सुटला. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिस निरिक्षक आर. एस. पडवळ, उपनिरीक्षक मुखेडकर, होमगार्ड सुरेश गिते यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंग झडती घेउन त्याच्याकडील दोन खंजीर,  एक लोखंडी हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. 

दरम्यान,  चोरट्याला त्याचे नाव विचारले असता सुरुवातीला त्याने बनावट नावे सांगितली; परंतु पोलिसी खाक्या दाखवताच माधव किशन भोसले असे नाव सांगितले असून, तो लोहा तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीने यापूर्वी अनेक वेळा घरपोडी, चोरीचे गुन्हे केले असून, हे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

Web Title: The armed thief was arrested after being chased in Kandhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.