एनआयएने नांदेडमध्ये एक तर परभणीत चौघांना घेतले ताब्यात

By शिवराज बिचेवार | Published: September 22, 2022 06:35 PM2022-09-22T18:35:32+5:302022-09-22T18:36:32+5:30

राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक बुधवारी रात्री नांदेड शहरात दाखल झाले होते. या पथकाने शहरातील देगलूर नाका भागातून मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे.

The NIA has detained one in Nanded and four in Parbhani | एनआयएने नांदेडमध्ये एक तर परभणीत चौघांना घेतले ताब्यात

एनआयएने नांदेडमध्ये एक तर परभणीत चौघांना घेतले ताब्यात

Next

नांदेड - राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) टेरर फंडिंग प्रकरणात देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकल्या जात असून, २२ सप्टेंबर रोजी एनआयएने नांदेड येथून एकास तर परभणीतून चौघांना ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांना न्यायालयाने आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर एक जण फरार आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक बुधवारी रात्री नांदेड शहरात दाखल झाले होते. या पथकाने शहरातील देगलूर नाका भागातून मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे. महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयएची दिल्लीची टीम पहाटे ३ वाजता धडकली होती. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तिघांना ताब्यात घेऊन तब्बल १२ तास चौकशी केली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडले होते. त्यानंतर बुधवारी रात्री एनआयएचे पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. 

स्थानिक एटीएसच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देगलूर नाका भागात छापा मारला. पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेतले. अन्सारी याचे भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, परभणीतूनही अब्दुल सलाम (३४), महोम्मद निसार (४१, परभणी), महोम्मद जाविद (३५), अब्दुल करीम (३५) या चौघांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

आठ दिवसांची कोठडी सुनावली

नांदेड येथून ताब्यात घेतलेला मेहराज अन्सारी तसेच परभणी येथून ताब्यात घेतलेले अब्दुल सलाम, मोहम्मद निसार, मोहम्मद जाविद, अब्दुल करीत या पाचही जणांना २२ सप्टेंबर रोजी येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पाचही जणांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाबाहेर घोषणाबाजी

एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. सुनावणी सुरू असताना पीएफआय जिंदाबाद, एनआयए गो बॅक, एटीएस गो बॅक अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 

Web Title: The NIA has detained one in Nanded and four in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड