सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे
By शिवराज बिचेवार | Published: September 3, 2022 12:31 PM2022-09-03T12:31:15+5:302022-09-03T12:31:42+5:30
आयटीआय येथील पार्किंग ठिकाणी सकाळी सर्व वाहने लावून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले होते.
नांदेड- महापालिका सफाई कामगार यांनी ऐन सणासुदीला संप पुकारला होता.कंत्राटदार कंपनीच्या आश्वासना नंतर मागे घेण्यात आले.
थकीत पगार, पगार वेळेवर द्यावा, घरभाडे भत्ता द्यावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी कामबंद ठेवण्यात आले तर शनिवार पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुरण्यात आले होते. एकूण 800 कंत्राटी सफाई कर्मचारी कार्यरत आहेत.
आयटीआय येथील पार्किंग ठिकाणी सकाळी सर्व वाहने लावून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. सकाळी 8 वाजताच सफाई कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकाने येऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. थकीत पगार 5 सप्टेंबर पूर्वी तसेच नियमीत पगार देण्याचे आणि घरभाडे देण्याचे कंत्राटदाराने मान्य केले. मागण्या मान्य झाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.