श्रींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू.....!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:06 PM2024-09-17T15:06:48+5:302024-09-17T15:07:15+5:30
- युनूस नदाफ पार्डी (नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील आठवीत वर्गात शिकणारा बालाजी गंगाधर सूर्यवंशी वय ...
- युनूस नदाफ
पार्डी (नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील आठवीत वर्गात शिकणारा बालाजी गंगाधर सूर्यवंशी वय -१४ मंगळवारी सकाळी १० वाजता घरातील श्रीचे विसर्जन करण्यासाठी चार ते पाच मित्रांना सोबत घेऊन गेला असता नदीमधील पाण्याचा अंदाज आला नसल्याने खोल पाण्यात गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने देळूब ( बु. ) गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी आनंद चतुर्थी असल्याने सर्वत्र गणेश विसर्जन करण्यासाठी सकाळपासून तयारी केली जात होती. सार्वजनिक गणेश मंडळ दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणूक काढून सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान श्रीचे विसर्जन करण्यासाठी तयारी करीत असताना काहीजण घरातील लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सकाळी दहा वाजताच नदीकडे निघाले होते. बालाजी गंगाधर सूर्यवंशी हा सुद्धा घरातील गणेश विसर्जन करण्यासाठी गणेश मूर्ती घेऊन नदीकडे निघाला नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी तो नदी पात्रात उतरला परंतु नदी पात्रात नदीच्या खोलीचा अंदाज लागला नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला सोबत असलेल्या मित्रानी आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी नदीकडे धाव घेतली मात तोपर्यंत बालाजी सूर्यवंशी यांचा मुर्त्यू झाला होता.
सूर्यवंशी परिवारात एक मुलगा असल्याने आई वडिलांवर दुःखाचा डोगर कोसळला असून बालाजीला दोन बहिणी आहेत.गणेश विसर्जनच्या दिवशी विद्यार्थी बुडाल्याने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.