युवा सेनेतही नाराजीचा सूर; नांदेडात ३५ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
By शिवराज बिचेवार | Published: August 6, 2022 07:41 PM2022-08-06T19:41:13+5:302022-08-06T19:41:59+5:30
नव्या कार्यकारिणीत निष्ठावतांना डाववल्याचा आरोप करत दिला राजीनामा
नांदेड -शिवसेना पाठोपाठ आता युवा सेनेमध्ये देखील नाराजीचा सुर पहावयास मिळत आहे . निष्ठवतांना डावलल्याचा कारणाने युवा सेनेच्या 30 ते 35 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच युवा सैनिकांच्या राजीनाम्याची ठिणगी पडली.
शनिवारी युवा सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकारणीमध्ये निष्ठवंतांना डावलून पक्षात काम न केलेल्याना संधी दिली आहे, असा आरोप नाराज युवा सैनिकांनी केला आहे. राजीनामा दिला असला तरी इतर कोणत्याही गटात न जाण्याचा निर्णय नाराज युवा सैनिकांनी घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पाठवला आहे.