अर्धापूरला चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:27+5:302021-01-19T04:20:27+5:30

विवाहितेचा छळ देगलूर - ट्रक घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेवून ये असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या आरेापीवरिरूद्ध देगलूर ...

Theft to Ardhapur | अर्धापूरला चोरी

अर्धापूरला चोरी

googlenewsNext

विवाहितेचा छळ

देगलूर - ट्रक घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेवून ये असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या आरेापीवरिरूद्ध देगलूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. शेखापूर मंडळातील मदनपूर येथे विवाहिता राहते. पोलीस तपास करीत आहेत.

लसीकरणाला शुभारंभ

हदगाव - येथील ग्रामीण रुग्णलायात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.ढगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वामी, नगराध्यक्षा ज्योती राठोड, उपाध्यक्ष सुनील सोनुले, नगरसेवक वसुंधरा देशमुख, माजी नगराध्यक्ष अमीत अडसुळ, नगरसेवक फेरोज पठाण, संदीप सोनुले, संदीप काळबांडे, विष्णू चंद्रवंशी, दिलीप चव्हाण, संजय जाधव, आनंद कांबळे उपस्थित होते.

होकर्णा येथे व्याख्यानमाला

देगलूर - सीमावर्ती भागातील हाेकर्णा येथे जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यानमाला घेण्यात आली. यावेळी ओमकार सूर्यवंशी, प्रतीक्षा पाटील, आकोश वाडीकर यांनी जिजाऊंच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पाटील होते. कार्यक्रमासाठी सुधाकर शिंदे, भगवान मोरे, बापूराव शिंदे, प्रशांत पाचुंदे, संदीप शिंदे, मारोती ज्ञाते, संतोष शिंदे, सुनील मरपाळे, देवराव पाटील, भगवान शिंदे यांनी परिश्रम घेतले.

आरळी येथे भागवत कथा

बिलोली - तालुक्यातील आरळी येथे येत्या गुरुवारपासून सात दिवस अनंत महाराज बेलगावकर यांची श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.कोरोनाचे नियम पाळून भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक धोंडीबा मेहत्रे व गावकऱ्यांनी केले.

महिला कार्यकर्त्यांची भेट

माहूर - येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपा महिला कार्यकत्यांनी भेट देवून शासकीय नियमानुसार सर्व सुविधा आहेत की नाही याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा प्रतीभा भुसारे, तालुकाध्यक्षा अश्वीनी पाटील, शहराध्यक्षा अर्चना दराडे, उपाध्यक्ष संध्या शिंदे, प्रतीभा पाटील उपस्थित होत्या.

हिमायतनगरात पाणीटंचाई

हिमायतनगर - शहरातील प्रभाग क्र.७ मध्ये गेल्या २० दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात वंचित आघाडीचे विशाल हनवते यांनी नगर पंचायतीला निवेदन दिले. निवेदनावर स्वप्नील हनवते, प्रमोद हनवते यांचीही नावे आहेत. पाण्याअभावी अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

ट्रक व टेंपोची धडक

हदगाव - हदगावपासून चार कि.मी. अंतरावरील वडकुते पेट्रोलपंप व व्यंकटरमणा इंग्लीश स्कूललगत दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. एम.एच.२६-ए.डी.४९६७ हा हदगावकडून नांदेडकडे तर वारंगाकडून हदगावकडे एम.एच.०६-बी.डी.३२८८ या क्रमांकाचा ट्रक जात असताना दोघांची समोरासमोर टक्कर झाली. वारंग्याच्या ट्रकमध्ये अंगुर होते. अपघातानंतर अंगुराचा चिखल रोडवर पडला. पोलीस येईपर्यंत अनेकांनी अंगुर पळविले.

भजन संध्येचा कार्यक्रम

मांडवी - श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पणाच्या निमित्ताने मांडवी येथे रविवारी हिंगणघाट येथील तालश्री कलामंचच्या भजन संध्येचा कार्यक्रम घेण्यात आला. कल्पना आडे आयोजक होत्या. उद्घाटक श्याम भारती महाराज यांनी केले. यावेळी संध्या राठोड, कल्पना राठोड, कुंदन पवार, विठ्ठलराव मच्छरलावार, विनोद सुंकरवार, शैलेष राठोड आदी उपस्थित होते. प्रास्तावीक राहुल गोकुळ यांनी, सूत्रसंचालन अनिरूद्ध केंद्रे यांनी तर सुनील श्रीमनवार यांनी आभार मानले.

Web Title: Theft to Ardhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.