बावनवाडी जि.प.शाळेत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:27+5:302021-06-19T04:13:27+5:30
जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला जिल्ह्यात नायगांव, मुदखेड आणि इतवारा हद्दीत तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. गांधीनगर नायगांव येथे महेश ...
जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला
जिल्ह्यात नायगांव, मुदखेड आणि इतवारा हद्दीत तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. गांधीनगर नायगांव येथे महेश तिरकुलाल चौधरी, मुदखेडला देना बँकेसमोरून राहुल जालू चव्हाण तरइतवारा भागात कैलास भीमराव पपूलवाड यांची दुचाकी चोरट्याने लांबविली.
चार लाखांसाठी विवाहितेचा छळ
देगलूर येथे भंगार दुकान टाकण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात अहमद रहमान कुरेशी, सफिया रहेमान कुरेशी, बिलाल कुरेशी, शमीम शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतीच्या वादातून जबर मारहाण
बिलोली तालुक्यातील दुगाव येथे शेतातील फरळ काढल्याच्या कारणावरून बालाजी रावण नांगरे या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नारायण नांगरे, राजू नांगरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
कामाला नकार दिल्याने वाद
वडार गल्ली भागातील सुरेश मेटकर यांनी कामासाठी उचल म्हणून पाच हजार घेतले होते, परंतु काम पसंद नसल्याने ते विचारपूस करण्यासाठी गेले असताना, त्यांना किशन धोत्रे, नागेश धोत्रे, बाबू धोत्रे, चंदू पवार यांनी जबर मारहाण केली.
देशमुख यांच्या निधनाने चळवळीचे नुकसान
ॲड.प्रदीप देशमुख यांच्या निधनाने मराठवाडा विकास चळवळीचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख यांना मराठवाड्यातील प्रश्नांची जाण होती, असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य जीवन देसाई, डॉ.के.के.पाटील, द.मा.रेड्डी, डॉ.दामोधर थोरात यांची उपस्थिती होती.
नववी, दहावीचे शुल्क शासनाने भरावे
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे आरटीईच्या आठवीनंतर नववी आणि दहावीचे शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँगेस सेवा दलाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.