नांदेडच्या शासकीय रूग्णालयात चोरी; तीन लाखांची मशीन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 06:20 PM2021-11-11T18:20:38+5:302021-11-11T18:20:58+5:30

या धाडसी चोरीमुळे महाविद्यालय व रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Theft at government hospital in Nanded; Three lakh machine lampas | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात चोरी; तीन लाखांची मशीन लंपास

नांदेडच्या शासकीय रूग्णालयात चोरी; तीन लाखांची मशीन लंपास

googlenewsNext

नांदेड: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाची तीन लाखांची मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय परिसरात सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प आहे. विष्णूपुरी भागातील शासकीय रुग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान, तीन लाखांची पाईप जेटेरिटर मशीन उतरवण्यात आली. मशीन ही जाळीमध्ये असल्याने ती तशीच ठेवण्यात आली होती. दरम्यान, चोरट्यांनी संधी साधत जाळी तोडून मशीन चोरून नेली. 

बुधवारी प्रविण पाठणे यांच्या निर्शानास ही घटना आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमुळे महाविद्यालय व रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  प्र. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव गवळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft at government hospital in Nanded; Three lakh machine lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.