सहाय्यक निबंधक कार्यालयात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:39+5:302021-08-21T04:22:39+5:30

लिंबगाव, किनवटमध्ये दुचाकी चोरी लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पुयणी येथून विठ्ठल बालाजी पावडे यांची तर किनवट येथे भगतसिंग ...

Theft in the office of the Assistant Registrar | सहाय्यक निबंधक कार्यालयात चोरी

सहाय्यक निबंधक कार्यालयात चोरी

googlenewsNext

लिंबगाव, किनवटमध्ये दुचाकी चोरी

लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पुयणी येथून विठ्ठल बालाजी पावडे यांची तर किनवट येथे भगतसिंग नगरातून उत्तम भीमराव बुरकुले यांची दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात दोन्ही ठाण्यात गुन्हे नोंद झाले.

बाजारातून शिक्षकाचा मोबाईल लांबविला

नायगांव शहरातील शिवाजी चौक भागातील आठवडी बाजारातून शिक्षकाचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना १९ऑगस्ट रोजी घडली. व्यंकट किशनराव मोरे हे गजानन सेवा केंद्रासमोर भाजीपाला खरेदी करत असताना त्यांची नजर चुकवून १७ हजारांचा मोबाईल लांबविण्यात आला. या प्रकरणात नायगांव पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

खासगी रुग्णालयाचे साहित्य चोरीला

नायगांव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी भागात एका खासगी रुग्णालयाचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. डॉ. श्रीकांत लव्हेकर यांच्या रुग्णालयाचे स्कोर पाईप, ऑक्सिजन सिलिंडर असे ४० हजारांचे साहित्य चोरीला गेले. या प्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Theft in the office of the Assistant Registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.