मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:57 AM2018-12-02T00:57:01+5:302018-12-02T00:58:34+5:30

रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़

The theme of the temple is the national-international struggle | मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

Next
ठळक मुद्देहुंकार सभाविहिंपचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांचे प्रतिपादन

नांदेड : कोट्यवधी हिंदूची आस्था असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिराचा विषय हा हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीदचा नसून राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा आहे़ रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नवीन मोंढा मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते़ देशपांडे म्हणाले, राम मंदिरासाठी १५२८ पासून संघर्ष सुरु आहे़ राम हे केवळ शंभर कोटी हिंदूचे नव्हे, तर अनेक जाती-धर्मातील लोकांसाठी पुजनीय आहेत़ इंडोनेशियासारख्या मुस्लिमबहुल देशात भगवान श्रीरामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे़ त्यांच्या नोटेवर श्रीगणेशाचे चित्र आहे़ त्यामुळे इंडोनेशियाचा आदर्श घेतल्यास देशातील अनेक प्रश्न सहज सुटतील़ धर्मा-धर्मात भांडणे होणारच नाहीत़ अयोध्येतील राम मंदिरावर बाबराने तब्बल ७६ वेळा स्वाऱ्या केल्या़ त्यावेळी साडेतीन लाख लोकांची कत्तल झाली़ त्याचप्रमाणे सोमनाथावर गझनीने स्वारी करुन ते मंदिर तोडले होते़ तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून संसदेत कायदा करुन सोमनाथाचे मंदिर उभारण्यात आले़
अयोध्या आणि सोमनाथचा इतिहास एकसारखाच आहे़ अयोध्येवरही विदेशी आक्रमकांनी स्वारी केली़ असे असताना अयोध्येतील मंदिरासाठी वेगळा न्याय का? २२ वर्षे उच्च न्यायालयात चाललेले हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे़ या ठिकाणी आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येणे शक्य नाही़ हा खटला लांबविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत़ त्यामध्ये माओवाद्यांची बाजू उचलून धरणा-यांचाही समावेश आहे़
न्यायाला विलंब करणे म्हणजेच न्याय आकारणे हे साधे सूत्र आहे़ त्यामुळे संसदेत राम मंदिर उभारणीचा कायदा झालाच पाहिजे़ त्याचबरोबर देशातील जी गुलामीची प्रतीके आहेत ती हटविलीच गेली पाहिजे़ राम मंदिर उभारणीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून सुरुवात केल्यास दोन वर्षात मंदिर उभे राहील असेही ते म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर वीरुपाक्ष महाराज, बालयोगी देवपुरी महाराज, आनंद बन महाराज, ह़भ़प़चंद्रकांत महाराज लाठकर, ह़भ़प़माधव महाराज केंद्रे, ताराबाई बोमनाळे, कृष्णा देशमुख यांची उपस्थिती होती़

  • सत्याच्या विजयासाठी आपण लढा देत आहोत़ शीख धर्मातही प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे़ श्री गुुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी अवधपुरीत रामाचा जन्म झाल्याचे नमूद करुन ठेवले आहे़ त्यामुळे जन्म झाला त्याच ठिकाणी प्रभू रामाचे मंदिर व्हायला पाहिजे़ कोणत्याही धर्मातून धार्मिक ग्रंथ आणि स्थळ हटविले तर तो धर्मही नामशेष होतो़ त्यामुळे सरकारने चूक सुधारत स्वखर्चाने मंदिर उभारावे, असे प्रतिपादन सरबजित निर्मल यांनी केले़

Web Title: The theme of the temple is the national-international struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.