... तर जिल्ह्यातील १५ वर्षांवरील चार लाखांवर वाहने जाणार भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:45+5:302021-02-05T06:08:45+5:30
नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण वाहनांची संख्या ६ लाख २५ हजार ४४७ एवढी आहे. यामध्ये एकट्या दुचाकींची संख्या ४ लाख ...
नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण वाहनांची संख्या ६ लाख २५ हजार ४४७ एवढी आहे. यामध्ये एकट्या दुचाकींची संख्या ४ लाख ९३ हजार ९३६ एवढी असून, मोटारकार ३० हजार २०५, ट्रक आणि लॉरी १६ हजार ३७३ तर ट्रॅक्टरची संख्या १२ हजार ५७२ एवढी आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यास जिल्ह्यातील तब्बल चार लाखांवर वाहने स्क्रॅपमध्ये निघू शकतात.
चौकट.....
आतापर्यंत काय होता नियम?
यापूर्वी वाहनाला १५ वर्षे झाल्यानंतर परिवहन विभागाकडे घेऊन जावे लागत होते. या विभागाकडून वाहनाची फिटनेस तपासणी झाल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी वाहन चालविण्याची संधी मिळत असे. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी या गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट आणावे लागत असे. अशा पद्धतीने वर्षानुवर्षे जुनी झालेली वाहने रस्त्यावर धावत होती. मात्र, नव्या धोरणानुसार आता प्रत्येक वाहनाला वयोमर्यादा येणार आहे.
कोट....
शासनाने धोरण जाहीर केेले आहे. मात्र, या संदर्भात अद्यापपर्यंत आदेश प्राप्त झालेले नाहीत. हे धोरण १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्याचे जाहीर केलेले आहे. त्या संबंधीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
-अविनाश राऊत, सहायक परिवहन अधिकारी, नांदेड