एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू 

By श्रीनिवास भोसले | Published: August 6, 2024 02:00 PM2024-08-06T14:00:22+5:302024-08-06T14:01:48+5:30

खदान परिसरात फोटोसेशन करून पाच मित्र पोहण्यासाठी खदानित उतरले.

They went to save each other and all four drowned; Four friends drowned while swimming in a Khadan in Nanded  | एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू 

एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू 

सोनखेड (जि.नांदेड): नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी परिसरातील खदानीमध्ये पोहण्यास गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर एक जण बचावला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मयत सर्व इयत्ता बारावीतील विद्यार्थी असल्याचे समजते. चौघांचे मृतदेह मिळाल्याची माहिती आहे.

लोहा तालुक्यातील झरी परिसरात विद्यापीठाच्या बाजूला एक मोठी खदान आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यात नांदेडसह परिसरातील अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी पहाटे देगलूर नाका परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी झरी परिसरात आले. त्यांनी या परिसरात फोटोसेशन करून पोहण्यासाठी खदानित उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये शेख फुज्जाइल, काजी मुजम्मिल, आफान आणि सय्यद सिद्दिकी याचा समावेश आहे. तर मोहम्मद फैजान हा बचावला आहे.

घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना सुरुवातीस दोन आणि नंतर काही वेळाने दोन अशी चौघांची मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत.

एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले 
खदानी परिसरात फोटोसेशन केले. एकमेकांसोबत सेल्फी  काढले. त्यानंतर पोहण्याचा मोह आवरता न आल्याने मोहम्मद फैजान वगळता चौघेजण पाण्यात उतरले. आफान पोहत पोहत पुढे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला माघारी परतने कठीण झाले. त्यात दम लागल्याने तो बुडू लागल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी इतरांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

Web Title: They went to save each other and all four drowned; Four friends drowned while swimming in a Khadan in Nanded 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.