चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

By शिवराज बिचेवार | Published: August 21, 2022 12:33 PM2022-08-21T12:33:16+5:302022-08-21T12:34:24+5:30

हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते.

Thieves attacked the MLA's Madhavrao Patil house; Incident in Nanded | चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

Next

नांदेड: आमदार माधवराव पाटील यांच्या हदगांव इथल्या घरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असून मोबाईल लंपास केले आहेत. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते. सर्वप्रथम त्यांनी सीसीटीव्ही ची तोडफोड केली.घरातील काही मोबाईल गेले चोरीला गेले आहेत. दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासाठी ते मोबाईल आणण्यात आले होते. 
घरात कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यानी डल्ला मारला आहे. आमदारांकडून पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमदारांच्या घरात चोरी झाल्याने हदगाव मध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Thieves attacked the MLA's Madhavrao Patil house; Incident in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.