विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:11 PM2021-05-22T19:11:47+5:302021-05-22T19:13:16+5:30

विवाहित तरुणी सासर सोडून काही वर्षांपासून मामाकडे राहत असल्याने तरुणाच्या कुटुंबातून लग्नाला होता विरोध

The thought of bereavement took an extreme step; The loving couple ended their lives by hanging | विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले

विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले

Next
ठळक मुद्देमुलाच्या लग्नाची तयारी सुरु होतीविवाहित तरुणी सासर सोडून मामाकडे राहत होती

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगुलाच्या लग्नाला घरच्या मंडळींनी विरोध केल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजता उघडकीस आली.

कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे (२४) व विवाहित शारदा खंडू माने (२५, रा. चिकाळा) यांचे प्रेमसंबंध होते. विवाहिता ही पतीशी पटत नसल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथे वास्तव्यास होती. याच ठिकाणी दोघांचे सूत जुळले. मात्र, दोघांच्या संबंधांची कुणकुण नातेवाइकांना लागली. शारदा ही विवाहित असल्यामुळे भिंगोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रेम संबंधाला विराेध होता. तसेच दत्ता याच्या घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. सोयरीकही जुळवून आली होती. मात्र, दत्ताने शारदासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्न झाल्यानंतर त्याला शारदापासून कायमचे दूर व्हावे लागत होते.

विरहाच्या विचाराने उचलले टोकाचे पाऊल
विरहाच्या विचाराने दोघेही निराश झाले होते. त्यामुळे त्यांनी सोबत जगता येत नसेल तर सोबत मृत्यूला जवळ करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावाशेजारील चंद्रकुमार वानखेडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कामारवाडी येथे दुपारी एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोउपनि हेमंत चोले हे करीत आहेत.

Web Title: The thought of bereavement took an extreme step; The loving couple ended their lives by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.