राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमुळे हजारो हेक्टरवरील पिके धूळग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:37+5:302021-01-25T04:18:37+5:30

चौकट- संबंधित रस्त्याच्या कामामुळे रोडलगतच्या शेतकऱ्यांचे किमान तीन हंगाम मातीत गेले आहेत. रोड रुंदीकरण व खोदकामामुळे मुरूम व माती ...

Thousands of hectares of crops have been affected by the construction of national highways | राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमुळे हजारो हेक्टरवरील पिके धूळग्रस्त

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमुळे हजारो हेक्टरवरील पिके धूळग्रस्त

Next

चौकट-

संबंधित रस्त्याच्या कामामुळे रोडलगतच्या शेतकऱ्यांचे किमान तीन हंगाम मातीत गेले आहेत. रोड रुंदीकरण व खोदकामामुळे मुरूम व माती रोडवर येते. त्यावरून चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. चारचाकी व अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ शेतातील पिकांवर येऊन पडतात. त्याचे अक्षरश: थर तयार होतात. त्यामुळे पिके कोकडून जातात. साधारणपणे १०० ते ५०० मीटरपर्यंत धूळ पसरते. या पिकांच्या नुकसानभरपाईची कुठेच सोय नाही. तसेच याविषयी कोणतीही संघटना बोलण्यास तयार नाही.- अशोक उफाडे, पीक रक्षक कार्यकर्ते, सेलू, जि. परभणी.

चौकट - मागील तीन वर्षांपासून आमच्या शेतातील पिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. मालेगाव-वसमत या रस्त्याचे काम काही ठिकाणी झाले असले तरी पुलाचे कामे सुरू आहेत. वसमत शहराजवळ असलेल्या महामार्गावरील पुलाचे काम सुरू असले तरी या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. लगतच्या शेतातील पिके धुळीने माखली आहेत. - सर्जेराव शिंदे, शेतकरी, वसमत, जि. हिंगोली.

Web Title: Thousands of hectares of crops have been affected by the construction of national highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.