अनुदानात हजार रुपयांची कपात, संतप्त शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:22 AM2021-06-09T04:22:52+5:302021-06-09T04:22:52+5:30
हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे ...
हजार रुपये कपात करून घेतले जात असून, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. बँक खात्यावर हजार रुपये जमा पाहिजे तर गतवर्षी कपात केलेले हजार रुपये कुठे गेले, तसेच बँक कोणत्याही शेतकऱ्यांना पासबुक देत नाही. त्याची नोंद नाही, मग शेतकऱ्याचा कपात केलेला पैसा गेला कुठे, बँक कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे सदर अनुदानाची रक्कम गाव दत्तक असलेल्या बँकेतूनच अदा करावी, जेणेकरून कोरोना काळात शेतकऱ्यांची लूट होणार नाही.
- कैलास पुंड, शेतकरी तथा सरपंच, पिंपळगाव.
बँकेच्या नियमाप्रमाणे खात्यात १ हजार रुपये ठेवले जातात. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना काढण्याचा अधिकार असून, बँकही ती रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देऊन टाकते; परंतु बँक खाते सुरू ठेवण्यासाठी किमान हजार रुपये जमा असावेत म्हणून हजार रुपये जमा करून घेतले जातात. - माजी आ. वसंतराव चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नांदेड.
दिवभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते
सध्या पेरण्यांचे दिवस सुरू झाले आहेत. अनुदान जमा झाल्याने पेरणीस हातभार लागेल या आशेने बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यास बँक कर्मचारी अन् प्रशासनाचे उदासीन धोरण जबाबदार आहे. सकाळी दहा वाजेपासून रांगेत थांबल्यावर दुपारी ३ वाजता कॅश नाही, असे सांगितले जाते. त्यात गर्दी असल्याने कोणाचाही विड्रॉल जमा करून घेतला जात नाही किंवा शिस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे महिला शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.