कोरोनाचा धोका कायमच, गुरूवारी ७० रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:17+5:302021-02-26T04:24:17+5:30
गुरूवारी ४० रूग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५, मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातून ...
गुरूवारी ४० रूग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५, मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातून ११, खासगी रूग्णालयातून ८, जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पिटलमधून १२ आणि गोकुंदा रूग्णालयातून ४ रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४७० वर पोहोचली आहे. त्यातील १४ रूग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२, जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ४७, किनवट १९, हदगाव ३, देगलूर ६ आणि खासगी रूग्णालयात ४१ रूग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रूग्णांमध्ये मनपा अंतर्गत २६८ तर जिल्ह्यात ६४ रूग्णांचा समावेश आहे.
कोरोना रूग्णांसाठी जिल्ह्यात आज घडीला विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६१ तर जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ५७ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर बाधित रूग्ण घरी परतण्याचे प्रमाण आता ९४.५४ टक्के इतके झाले आहे.
जिल्ह्यात आठवडाभरात प्रतिदिन ५० हून अधिक रूग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना वाढते रूग्ण ही चिंतेची बाब बनली आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आता कठोर उपाय योजनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.