चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:41+5:302021-04-26T04:15:41+5:30

नांदेड : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूने जिवे मारण्याची धमकी देत ट्रकचालकाकडून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड जबरीने काढून ...

Threatening to kill with a knife | चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन

चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन

Next

नांदेड : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूने जिवे मारण्याची धमकी देत ट्रकचालकाकडून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेऊन पलायन केले. ही घटना २४ एप्रिल रोजी पहाटे दीड ते दोन वाजेदरम्यान बोंढार ‘बाय’पास रोडवरील गुरुगोविंदसिंगजी पेट्रोलपंपाजवळ घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक बबलू झुंजारलाल केवट व क्लिनर सुरेश दायमा (रा. परबतखेडा, ता. मेथपूर, जि. उज्जैन. मध्य प्रदेश) हे २४ एप्रिल रोजी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये (क्र. एमपी १३, एच ०३५८) मुगाची दाळ घेऊन जालना येथे जात होते. दरम्यान, नवीन नांदेड परिसरातील धनेगाव बायपास रोडने जात असताना रोडवर खड्डे व समोर जीप असल्याने ते ट्रक सावकाश चालवत होते. त्याचवेळी बायपास रोडवरील बोंढार परिसरातील गुरुगोविंदसिंगजी पेट्रोलपंपाजवळ एका पल्सर दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी त्यांची दुचाकी ट्रकसमोर उभी करत त्या दोन तरुणांपैकी एकाने चाकूच्या मुठीने आपल्या उजव्या हाताचे पोटरीवर बुका मारला व तेरे पासके पैसे निकाल असे म्हणाला व जिवे मारण्याची धमकी दिला, तर दुसऱ्याने ट्रकच्या टुलमधून ५० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले, असे ट्रकचालक बबलू केवट यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.एन. मोरे खैरकेकर व पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते यांनी दिली.

अनोळखी चोरट्यांनी जबरीने काढून घेतलेल्या रोख ५० हजार रुपयांमध्ये ५०० तसेच १०० रुपयाच्या नोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी उपरोल्लेखित ट्रकचालक बबलू झुंजारलाल केवट यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे तसेच कॉन्स्टेबल शेख उमर हे उपरोक्त जबरी चोरी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Threatening to kill with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.