कोरोनाला वाकुल्या दाखवत गावा गावांत उडाला साडेतीन हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:09+5:302021-04-21T04:18:09+5:30

चौकट- अनेकांनी नोंदणी विवाहाला दिले प्राधान्य- कोराेनाची वाढती रूग्ण संख्या आणि बदलत जाणारी परिस्थती पाहता काहींनी थेट नाेंदणी विवाहाला ...

Three and a half thousand wedding bars were blown up in the villages showing the corona | कोरोनाला वाकुल्या दाखवत गावा गावांत उडाला साडेतीन हजार लग्नांचा बार

कोरोनाला वाकुल्या दाखवत गावा गावांत उडाला साडेतीन हजार लग्नांचा बार

Next

चौकट-

अनेकांनी नोंदणी विवाहाला दिले प्राधान्य- कोराेनाची वाढती रूग्ण संख्या आणि बदलत जाणारी परिस्थती पाहता काहींनी थेट नाेंदणी विवाहाला प्राधान्य दिले आहे. यातून कोरोनाचे संकट टाळण्यात काही कुटुंब यशस्वी ठरले आहेत. काहींनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकले. मात्र, लग्नात सहभागी झालेल्या वर्हाडींनाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. काेरोनाला बाजुला सारत अनेकांनी नोंदणी विवाह केले आहे.

चाैकट-

यंदा विहाहाचे ५३ मुहूर्त

- १९ जानेवाी ते २१एप्रिलपर्यंत यंदा गुरू, शुक्र अस्तामुळे तारखा कमीच आहेत. दिवाळीनंतर तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नांचा धडाका सुरू होतो. मात्र कोरोनाने अडचण केली आहे. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत एकुण ५३ शुभ मुहूर्त आहेत. एप्रिल- ७, मे महिन्यात १५, जून - ८ आणि जुलै महिन्यात ४ तारखाच आहेत.

- एप्रिल महिनाही कठिणच

यंदाच्या हंगाम हाती असलेल्या एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात लग्न तारखा आहेत. मात्र ३० एप्रिलपर्यंत शासनाचे कडक निर्बंध आहेतम.परिणामती याही महिन्यात लग्न सोहळे करता येणार नाहीत. मे महिन्यात सर्वाधिक १५ तिथी आहेत. मात्र ते ही परिस्थितीवर अवलंबून आहेत.

प्रतिक्रिया. -

१.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या लग्नसराईवर कोरोनाचे सावट अधिक आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरोनाची रूग्ण संख्या घटली होती. त्यामुळे प्रशासनाकडून शिथिलता देण्यात आली होती. मात्र मार्चपासून पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे चित्र बदलले आहे. अनेकांनी लग्नासाठी बुकिंग केलेले मंगल कार्यालय रद्द केले. त्यामुळे चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

२.कोरोनामुळे मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन कोलमडले आहे. यंदाच्या लग्नसराईत उलाढाल पूर्णता ठप्प झाली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यातील तारखांचखी बुकिंग अनेकांनी रद्द केली आहे. सध्याला कोरोनाचे रूग्ण संख्या वाढत असल्याने आणखी किती दिवस अशीच परिस्थिती राहणार हे कळत नाही. परंतु सर्वांवर वाईट वेळ आली आहे. बँकाचे हप्ते थकले आहेत.

Web Title: Three and a half thousand wedding bars were blown up in the villages showing the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.