२२ लाख रुपयांचा माल चोरणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:08+5:302021-03-27T04:18:08+5:30
'डिजॉन' कॅज्युअल्स प्रा. लि.चे मालक, व्यवस्थापक, कर्मचारी तसेच नोकर नेहमीप्रमाणेच १६ मार्च रोजी सायंकाळी उशिरा रेडिमेड ड्रेसेसचे गोदाम ...
'डिजॉन' कॅज्युअल्स प्रा. लि.चे मालक, व्यवस्थापक, कर्मचारी तसेच नोकर नेहमीप्रमाणेच १६ मार्च रोजी सायंकाळी उशिरा रेडिमेड ड्रेसेसचे गोदाम व किरकोळ रेडिमेड ड्रेसेसचे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी १७ मार्च रोजी पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. सुट, शेरवानी, ब्लेजर, हेवी जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस, दोन संगणक आणि काउंटरमधील रोख ५०० रुपयांसह सुमारे २१ ते २२ लाख रूपये किंमतीचे रेडिमेड ड्रेसेस चोरून नेले. या प्रकरणात प्रेमचंदाणी व व्यवस्थापक खान चोरट्यांनी प्रारंभी, गोदामामधील 'सीसीटीव्ही'चे वायर तोडले होते. अखेर २४ मार्चच्या मध्यरात्री या चोरी प्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी २५ मार्च रोजी दुपारी अटक केलेल्या आरोपी दिगांबर तुकाराम धुमाळे (रा. वाघाळा, नांदेड), नामदेव संभाजी मुंडे (रा. श्रीपाद नगर, कौठा) व नरसिंग रामकिशन ओझा (रा. कालेजी टेकडी, जुना मोंढा, नांदेड) या तिघांना न्यायालयात हजर केले आले असता, उपरोक्त आरोपींना न्यायालयाकडून २९ मार्चपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
२२ लाख रूपयांच्या मुद्देमालापैकी सुमारे १८ लाख रूपयांचा मुद्देमाल व या गुन्ह्यात वापरलेला एमएच-२६, बीई-३३५० क्रमांकाचा टेंपो जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांना या चोरीप्रकरणामधील अन्य दोन आरोपी तसेच उर्वरित मुद्देमालही जप्त करायचा आहे.