जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:10+5:302021-05-22T04:17:10+5:30
युवकाचे खिशातील पैसे लांबविले रस्त्याने पायी जाणाऱ्या एका युवकाच्या खिशातील साडेबारा हजार रुपये चोरट्याने लांबविले. ही घटना २० मे ...
युवकाचे खिशातील पैसे लांबविले
रस्त्याने पायी जाणाऱ्या एका युवकाच्या खिशातील साडेबारा हजार रुपये चोरट्याने लांबविले. ही घटना २० मे राेजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. श्रीपाद आप्पाराव जाधव हे बन्नाळीकर हॉस्पिटल ते आंबेडकर पुतळा रस्त्यावरुन जात होते. यावेळी चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पैसे लंपास केले. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारुसाठी पैसे न दिल्याने हल्ला
दारुसाठी पैसे न दिल्याने एका मजुरावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना १९ मे रोजी मौजे हस्सापूर शिवारात घडली. आशिष उत्तमराव अंभोरे हे १९ मे रोजी रात्री अंबामाता मंदिराजवळ असताना आराेपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. अंभोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एका लाखासाठी विवाहितेचा छळ
ॲटो घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना १८ मे रोजी उमरी तालुक्यातील मौजे हस्सा येथे घडली. पीडितेने पैसे न आणल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ग्रामपंचायतच्या जागेत पत्त्यांचा डाव
हिमायतनगर येथे ग्रामपंचायतच्या जागेवर झन्ना मन्ना हा जुगाराचा डाव रंगला होता. या ठिकाणी धाड मारुन पोलिसांनी साडेसहा हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे तिर्रट नावाच्या जुगारावर छापा मारुन ६५ हजार ८०० रुपये जप्त केले. कुंडलवाडी येथे आणखी एक जुगार अड्डा पकडला असून दोन हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.