तीन दिवसांत रेमडेसिवीर पुरवठा सुरळीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:00+5:302021-04-21T04:18:00+5:30
चौकट------------- काळा बाजारप्रकरणी आजवर तीन गुन्हे मागील काही दिवसांत मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा अत्यल्प पुरवठा होत होता. त्यामुळे इंजेक्शनचा काळा ...
चौकट-------------
काळा बाजारप्रकरणी आजवर तीन गुन्हे
मागील काही दिवसांत मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा अत्यल्प पुरवठा होत होता. त्यामुळे इंजेक्शनचा काळा बाजार करीत दाम दुप्पट किमतीने रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन्स दिली जात होती. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात आजवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यातील दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात, तर एक गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात औषध विक्रेता तब्बल २२ हजाराला हे इंजेक्शन विकत असल्याचे पुढे आले होते.
कोट-------------
इंजेक्शनचा तुटवडा लवकरच थांबणार
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर गंभीर रुग्णांची संख्याही वाढली होती. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र, हे इंजेक्शन सरसकट देणे योग्य नाही. या अनुषंगाने रुग्ण तसेच नातेवाइकांचे समुपदेश करण्यास सांगितले आहे. याबरोबरच आवश्यक त्या रुग्णांना इंजेक्शन मिळाले पाहिजे, यासाठी शासनाकडे १५ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. ही इंजेक्शन्स उपलब्ध झाल्यानंतर रेमडेसिविरचा तुटवडा थांबेल.
-डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी, नांदेड.