तीन ग्रामसेवकांनी केला ११ लाख ६६ हजार रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 04:31 PM2019-09-26T16:31:12+5:302019-09-26T16:32:47+5:30
बनावट कागदपत्राच्या आधारे केला अपहार
नांदेड : १४ व्या वित्त आयोगांतर्गत एलईडी पथदिवे बसवणे आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचे बनावट कागदपत्र तयार करून तब्बल ११ लाख ६६ हजार रुपयांचा दोन ग्रामविकास अधिकारी आणि एका ग्रामसेवकाने अपहार केल्याची घटना नायगाव तालुक्यातील गडगा येथे घडली़ या प्रकरणी नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़.
गडगा ग्रामपंचायतीला २०१५ ते २४ एप्रिल २०१९ या कालावधीत १४ व्या वित्त आयोगांतर्गत एलईडी पथदिवे बसवण्यात आले़ प्रत्यक्षात हे पथदिवे कागदावच बसवले़ तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचेही बनावट कागदपत्र तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी़एसक़ेते, एम़एम़शेख आणि ग्रामसेवक एस़व्हीक़ौशल्य यांनी तयार केले़
शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत न पोहोचविता त्यांना वंचित ठेवून शासकीय निधीचा स्वत:च अपहार केल्या प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव नामदेवराव केंद्रे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ या तक्रारीवरून कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आाल आहे़ या घटनेप्रकरणी अद्याप ग्रामविकास अधिकारी डी़एस़ केते, एम़एम़शेख आणि ग्रामसेवक एस़व्हीक़ौशल्य यांना अटक झाली नाही़ त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.