तीन गुरूव्दारांनी भरले तब्बल ८ लाख, कृषिपंपांची थकबाकी कोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:32 AM2021-03-13T04:32:10+5:302021-03-13T04:32:10+5:30
लोहा उपविभागअंतर्गत येणाऱ्या वडेपुरी-खरबी गुरूद्वारा, तर नांदेड शहर विभागाअंतर्गत काळेश्वर गुरुद्वारा व मुगट गुरुद्वारा येथील एकूण २८ कृषिपंपांकडे एकूण ...
लोहा उपविभागअंतर्गत येणाऱ्या वडेपुरी-खरबी गुरूद्वारा, तर नांदेड शहर विभागाअंतर्गत काळेश्वर गुरुद्वारा व मुगट गुरुद्वारा येथील एकूण २८ कृषिपंपांकडे एकूण थकबाकी १५ लाख ९० हजार रुपये होती. महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा लाभ घेत ८ लाख १० हजार रुपयांची सवलत मिळाली. कृषी ऊर्जा पर्वाचा मोठा दिलासा मिळाल्यामुळे ७ गुरूव्दारांच्यावतीने ७ लाख ८० हजार रुपयांचा भरणा केल्यामुळे त्यांचे २८ कृषिपंप थकबाकीमुक्त झाले आहेत.
नांदेड ग्रामीण विभागाच्यावतीने कृषिपंप थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असून, थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कृषी ऊर्जा पर्वाची माहिती देत थकबाकी भरण्यासाठी व नवीन वीजजोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी दिली. याकरिता कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सचिन दंवडे, सहायक लेखापाल कार्तिक जाधव, उच्चस्तर लिपिक आर. डी. सिंदगीकर व जनमित्र परिश्रम घेत आहेत.