पैनगंगा नदीवरील अपघातात तीन ठार, मृतामध्ये आ.अनिल गोटे यांच्या बंधूचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:01 PM2017-08-25T17:01:28+5:302017-08-25T17:07:34+5:30
नागपुरवरून परभणीकडे जाणार्या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्या भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मयतामध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटया बंधू व भावजयीचा समावेश आहे.
हदगाव (हिंगोली ), दि. २५ : नागपुरवरून परभणीकडे जाणार्या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्या भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मयतामध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटया बंधू व भावजयीचा समावेश आहे.हा अपघात शुक्रवारी दि.२५ रोजी हदगाव-उमरखेड रोडवरील पैनगंगानदीवर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर गोटे हे परभणी येथे भुमापन अधिकारी म्हणून कार्यरत असत. नागपुरवरून परभणीकडे निघाले असता, मराठवाडा-विदर्भाला जोडणार्या पैनगंगा पुलावर कार जात असताना समोरून येणार्या अज्ञात ट्रकने कारला जोराची धडक दिली. समोरून येणार्या ट्रकचा वेग इतका होता, की कार पुलावरून कोसळून नदीपात्रात जाऊन पडली. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग नव्हता. त्यामुळे कार पुढे जाऊ शकली नाही.
अपघातात झाल्याचे या मार्गावरून जाणार्या वाहनचालकांनी पाहिले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेथील नागरिक व पोलिसांच्या मदतीने कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र तत्पर्वूीच सर्वांचा जागीच मृत्यू झालेला. या वेळी कागदपत्रांची तपासणी केली, असता मयतांची ओळख पटू शकली.
यात परभणी येथे भुमापन अधिकारी असलेले ज्ञानेश्वर उमराव गोटे त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटे, व चालकाचा समावेश आहे. मात्र चालकाचे नाव समजू शकले नाही.कारचे दरवाजे लाँक झाले होते, काचाही बंद होत्या त्यामुळे अपघातग्रस्ताना बाहेर पडता आले नसल्याचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे यानी सांगीतले. गोटे यांच्या नौकरीचा कार्यकाळ आठरा महिने शिल्लक राहीला होता. त्याना एकुलती एक मुलगी आसुन ती मुबंई येथे राहते.
दरम्यान एक ट्रक आर्णी च्या पोलीसानी पकडला असुन हदगाव पोलीसाचे एक पथक ट्रक आणण्यासाठी आर्णी ला रवाना झाले आहे.तसेच पोलिसांनी तिघांचे मृतदेह हदगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.