आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीतील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:52 AM2018-10-26T00:52:34+5:302018-10-26T00:52:50+5:30

मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़

Three militant gangs of inter-state gangsters | आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीतील तिघे जेरबंद

आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीतील तिघे जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़
नांदेड शहर व मुदखेड येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानाच्या वरील टीन पत्रे काढून दुकानातील माल लंपास करण्याच्या घटना मागील सात ते आठ महिन्यांत मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या़ या चोरट्यांनी अशा पद्धतीने बाजारपेठेत हैैदोस मांडल्याने व्यापाऱ्यांसह पोलिसांसमोरही या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले होते़ या चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी़डी़ भारती यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते़ २४ आॅक्टोबर रोजी हे पथक एका प्रकरणाच्या चौकशीसाठी लातूर येथे गेले असता नांदेड जिल्ह्यात होणाºया दुकानफोडीतील आरोपीबाबतची माहिती पथकाला मिळाली़ निजामाबाद येथील श्रीनिवास उर्फ सिनू हा त्याचा साथीदार शेख फारूख याच्यासह सध्या लातूरमध्ये राहत असून त्याच्याच टोळीने नांदेड शहर तसेच मुदखेडमध्ये चोºया केल्याचे समजले़ या माहितीवरून लातूर अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेसमोरून चौक क्रमांक ५ परिसरात पोलिसांनी सापळा रचून तेथे थांबलेल्या श्रीनिवास उर्फ सिनू राजेश्वर करपे (वय २२, रा़निजामाबाद, हल्ली मु़ आबादी, पाठ गल्ली उमरी), सय्यद यासीन सय्यद याकुब (वय ३१, रा़जयनगर, हनुमान मंदिर समोर, लातूर) आणि शेख फारूख शेख मोहम्मद उर्फ सलीम (वय २१, रा़चोंडेश्वर, ता़लातूर) या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांना पोलिस खाक्या दाखवून चौकशी केली असता त्यांनी मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील मुदखेडसह इतवारा, वजिराबाद भागात सुमारे पन्नासावर दुकानांचे टीनपत्रे कापून दुकानात प्रवेश केल्याचे आणि दुकानातील ऐवज लांबविल्याची कबुली दिली़ दरम्यान, या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून आरोपीविरोधात तेलंगणातही घरफोडीचे गुन्हे दाखल असून श्रीनिवास उर्फ सिनू करपे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून पुढे आले आहे़या आरोपींना मुदखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Three militant gangs of inter-state gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.