रेती तस्करास तीन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:46 AM2019-03-17T00:46:55+5:302019-03-17T00:47:18+5:30

तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत खळबळ उडाली आहे.

Three year rigorous imprisonment for sand smugglers | रेती तस्करास तीन वर्षांचा सश्रम कारावास

रेती तस्करास तीन वर्षांचा सश्रम कारावास

Next
ठळक मुद्दे५० हजार रूपये दंड : बेलूर येथून विनापरवाना रेतीची वाहतूक

धर्माबाद : तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत खळबळ उडाली आहे.
धर्माबाद तालुक्यातील बेलूर गावाहून येथील महाराष्ट्र बसस्थानकाकडे विकास साहेबराव किलबिले हा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच - २६ व्ही - ७६०९) मध्ये चार ब्रास रेती १२ मे २००५ रोजी घेऊन जात असताना मध्यरात्री तात्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून कागदपत्रांची तपासणी केली असता सदरील वाळू चोरट्या मार्गाने विनापरवाना नेत असल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांत तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास साहेबराव किलबिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील प्रकरणाचा तपास जमादार जनार्दन बोधने यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणात न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील ए. ए. शिखरे यांनी साक्षी व सबळ पुराव्यासह आपली बाजू भक्कमपणे मांडली. पोलीस नाईक भगवान श्रीरामे यांनी मदत केली. यावरून न्यायाधीश गजभिये यांनी विकास किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिक कारावासाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास अधिकचा कारावास
तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टर मध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणाचा तपास जमादार जनार्दन बोधने यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणात न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Three year rigorous imprisonment for sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.