तीन वर्षात १ लाख १८ हजार ३६१ बेरोजगारांची नोंदणी मात्र अद्याप एकालाही मिळाली नाही नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:54+5:302020-12-25T04:14:54+5:30
मागील काही वर्षापासून शासकीय नोकरभरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना खाजगी कंपन्या शिवाय आता कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे ...
मागील काही वर्षापासून शासकीय नोकरभरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना खाजगी कंपन्या शिवाय आता कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे तरूण पुन्हा महानगराकडे धाव घेत आहेत. २०१९मध्ये कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे झालेल्या नोंदीप्रमाणे१ लाख १८ हजार ३६१ बेरोजगार तरूणांची नाेंदणी केली असून यामध्ये ८३ हजार ५४ बरोजगार युवक तर ३५ हजार ३०७ विद्यार्थींनींचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणत्याही बेरोजगारास अद्यापपर्यंत शासकीय नोकरी उपलब्ध झाली नाही.
चौकट- बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले.सध्या शासकीय नोकर भरती बंद असल्याने खाजगी कंपन्याकडे बेरोजगार वळले आहेत. - रेणुका तुम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड.
मेळाव्यांना प्रतिसाद
कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेडच्या वतीने वर्षभरात महास्वयंम वेब पोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांना जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रतिक्रिया १. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र त्याचा कोणताच उपयोग झाला नाही. सध्या मी कामाच्या शोधात आहे. - प्रमोद साळवे, नांदेड.