सिडको मुख्य रस्त्यावर लोकसहभागातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:31+5:302021-07-19T04:13:31+5:30
नांदेड : महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ...
नांदेड : महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. रविवारी लोकसहभागातून लातूर फाटा ते वसंतराव नाईक कॉलेज सिडको मुख्य रस्स्यावर दुतर्फा एक रस्ता- एक वृक्ष प्रकार अंतर्गत ५१ कदंब या मोठ्या वृक्षांची ट्री गार्डसह लागवड करण्यात आली.
या वृक्षलागवडीसाठी सहा फुटी बाबूंचे ट्री गार्ड सीए ब्रँच नांदेडच्या सभासदांनी भेट स्वरूपात दिले. तसेच वृक्षमित्र परिवाराचे विष्णू चन्नावार यांनी ५१ मोठी झाडे भेट दिली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी महापौर मोहिनी येवनकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, स्थानिक नगरसेवक काळे तसेच चार्टर्ड अकाउंट्स नांदेड ब्रँचचे अध्यक्ष सीए विजय वट्टमवार, कोषाध्यक्ष सीए आनंद काबरा, सीए नवज्योतसिंघ ग्रंथी, अन्वर अली तसेच मनपाचे उद्यान अधीक्षक डॉ. फरहत बेग, उल्हास महाबळे, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, सचिन जोड, राज गुंजकर, डॉ. परमेश्वर पौळ, डॉ. तुळशीराम चिमणे, संजय गौतम, विश्वनाथ पांचाळ, मारोती मोरे, अजित मोरे, क्षीरसागर, लोभाजी बिरादार, प्रताप खरात, लक्ष्मण गज्जेवार, प्रीतम भराडीया, प्रशांत रत्नपारखी, गणेश साखरे, कैलास अमिलकंठवार, प्रल्हाद घोरबांड, तसेच सीए विद्यार्थी असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी भाग घेत वृक्षारोपण केले.