ग्रामपंचायत निवडणुकीत अंगठे बहाद्दर होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:41+5:302020-12-26T04:14:41+5:30
धर्माबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी सातवी पास असणे बंधनकारक निवडणूक विभागाने केली असल्याने आता ग्रामपंचायतीत अंगठे बहाद्दर ...
धर्माबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी सातवी पास असणे बंधनकारक निवडणूक विभागाने केली असल्याने आता ग्रामपंचायतीत अंगठे बहाद्दर मात्र हद्दपार होणार असून अशिक्षित उमेदवारांची नाचक्की होत आहे. १९९५ नंतर जन्मलेले उमेदवार सातवीपर्यंत शिक्षण नसेल त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असे निवडणूक विभागाने आदेशित केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता अर्ज भरण्यासाठी लगबग चालू झाली आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया असून जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे काढण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत अशिक्षित महिला, पुरुष सदस्याचा भरणा अधिक असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार काय असते याबद्दल ज्ञात राहत नव्हते. गावाचा विकासासंदर्भात पत्र व्यवहार करताना शिक्षित गावपुढाऱ्याला घेऊन कामे करावे लागत होते. एवढेच नसून अशिक्षितपणाचा फायदा शिक्षित संरपच, अधिकारी, कर्मचारी व गावपुढारी घेत होते.
आता ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सातवी पास असणे निवडणूक विभागाने बंधनकारक केले आहे. १ जानेवारी १९९५ नंतर जन्म झालेल्या उमेदवारांना लागू करण्यात आला आहे. १९९५ पूर्वीचे जन्मलेले असतील त्यांना अटी लागू नाहीत. सरपंच पदासाठी सातवी पासची अट होती, आता सदस्यांनाही सातवी पासची अट लागू करण्यात आली असल्याने अशिक्षित म्हणजेच अंगठे बहाद्दर उमेदवार हद्दपार होणार आहेत. सातवी पासची अट लागू झाली असल्याने आता शिक्षित ग्रामपंचायत होणार आहे.