आज ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:01+5:302021-05-14T04:18:01+5:30
जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण व्हावे याची खबरदारी कुटुंबातील सदस्यांनी घेऊन तसे नियोजन करणे उचित राहिल. लसीकरण केंद्रावर १८ ...
जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण व्हावे याची खबरदारी कुटुंबातील सदस्यांनी घेऊन तसे नियोजन करणे उचित राहिल. लसीकरण केंद्रावर १८ ते ४५ वयोगटातील युवक-नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन अनावश्यक गर्दी करु नये. नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण ७ केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण १६ केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण ६७ केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर शुक्रवारसाठी कोविशिल्ड या लसीचे १०० डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात १३ मे पर्यंत कोविशिल्डचे ३ लाख २३ हजार ७३०, कोव्हॅक्सिनचे ९६ हजार ४४० डोस असे एकूण ४ लाख २० हजार १७० डोस मिळाले आहेत.