'संविधानाच्या पायावरच आजचा भारत उभा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:37+5:302021-02-18T04:31:37+5:30
दलितमित्र धनाजीराव घोडजकर स्मृतिदिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी गांधीनगर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते संविधाननिष्ठ राष्ट्रवाद या विषयावर बोलत ...
दलितमित्र धनाजीराव घोडजकर स्मृतिदिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी गांधीनगर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते संविधाननिष्ठ राष्ट्रवाद या विषयावर बोलत होते.
यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, सहायक अभियंता प्रकाश कांबळे, अभियंता बाशेट्टी यांची उपस्थिती होती.
डाॅ. राऊत म्हणाले, आपल्या संविधानामध्ये राज्यकारभार चालविण्याच्या नियमांशिवाय इतर अनेक मोलाच्या गोष्टी आहेत. संविधान या शब्दाचा अर्थ व्यवस्था असा आहे. निसर्गाने जशी सृष्टीतील सर्व गोष्टींची चोख व्यवस्था लावून ठेवलेली आहे, तशी माणसालाही आपल्या समाजजीवनाची चोख व्यवस्था लावावी लागते. कुठेही काहीही विस्कळीत राहिले तर त्याचा माणसाला त्रास होतो. देशातील सर्व गोष्टींची चोख अशी व्यवस्था लावून देणारा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान हाेय. प्रास्ताविक लसाकमचे राज्याध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केले. सूत्रसंचालन निरंजन तपासकर यांनी केले. यावेळी प्रा. सी. एल. कदम, संजय मोरे, आदी उपस्थित होते.