शीख समाजाचा आज शांतता मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:45 AM2019-01-21T00:45:00+5:302019-01-21T00:45:40+5:30

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारनियुक्त अध्यक्षाची निवड करणाऱ्या कलम ११ च्या विरोधात बोर्डाच्या सदस्यांनी रविवारी पंजप्यारे साहिबान यांची भेट घेतली होती़ त्यानंतर या कलमाच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

Today's peace rally of Sikh community | शीख समाजाचा आज शांतता मोर्चा

शीख समाजाचा आज शांतता मोर्चा

Next

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारनियुक्त अध्यक्षाची निवड करणाऱ्या कलम ११ च्या विरोधात बोर्डाच्या सदस्यांनी रविवारी पंजप्यारे साहिबान यांची भेट घेतली होती़ त्यानंतर या कलमाच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
दुपारी साडेतीन वाजता शीख समाजातील शेकडो जणांनी जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी व पंजप्यारे साहिबान यांना निवेदन दिले़ यावेळी श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, श्री गुरुद्वारा माता साहिबचे जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी उपस्थित होते़ बैठकीत पंजप्यारे साहिबान यांनी गुरुद्वारा बोर्ड अधिनियमात कोणत्याही प्रकारे बदल करण्यास विरोध दर्शविला़ तसेच २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सचखंड गुरुद्वारा येथे अरदास केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला़ पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे नेतृत्व संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा प्रेमसिंघजी हे करणार आहेत़
४राज्य सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम १९५६ मध्ये संशोधन करुन अध्यक्ष नियुक्तीसाठी कलम ११ चा समावेश केला होता़ त्यानुसार गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार हे शासनाला मिळाले होते़ तसेच बोर्डाचे सदस्य नामधारीच राहिले होते़ त्यामुळे लोकशाही पद्धतीने बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार सदस्यांना मिळावेत़ अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे़

Web Title: Today's peace rally of Sikh community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.