सिमेंट, स्टीलमध्ये झालेल्या भाववाढीच्या विरोधात आज धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:17 AM2021-02-12T04:17:30+5:302021-02-12T04:17:30+5:30
२०११ च्या जनगणनेनुसार ३१ टक्के लोकसंख्या ही नागरी भागात राहत होती. देशातील बांधकाम व्यवसायिकांना स्थलांतरीत लोकसंख्येसाठी घरे पुरवणे ही ...
२०११ च्या जनगणनेनुसार ३१ टक्के लोकसंख्या ही नागरी भागात राहत होती. देशातील बांधकाम व्यवसायिकांना स्थलांतरीत लोकसंख्येसाठी घरे पुरवणे ही संधी निर्माण झाली आहे. मात्र सध्या स्टीलमध्ये दीडपट आणि सिमेंटमध्ये १५ ते २० टक्के अनैसर्गिक भाववाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या १० महिन्यापासून रोजगाराची संधी नव्हती. ही भाववाढ कमी करावी, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशनने केली आहे. ज्या प्रमाणे शेअर मार्केटसाठी सेबी, टेलिकॉमसाठी ट्राय, विमा क्षेत्रासाठी आयआरडीएआय, रिअर स्टेटसाठी रेरा सारखी नियामत प्राधीकरण तयार करण्यात आली आहे. त्यात धर्तीवर सिमेंट नियंत्रण प्राणीकरण निर्माण करावे. यातून साठेबाजी व कृत्रिम भाववाढीवर नियंत्रण ठेवले जाईल. या भाववाढीच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, क्रेडाई महाराष्ट्र अभियांत्रिकी संघटना, मजूर सहकारी संस्था यांच्यावतीने कामबंद आंदोलन व धरणे आंदोलन शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून काकांडी येथे केले जाणार असल्याचे संघटनेचे बाबुराव शक्करवार, माणिकराव हेंद्रे, क्रेडाईचे गंगाप्रसाद तोष्णीवाल, दिलीप बाळसकर, नरेश पैंजणे, सुनील जोशी, मुकुंद जवळगावकर, प्रवीण जाधव आदींनी दिली.