जिल्ह्यातील तूर नोंदणी खरेदी केंद्र निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:05+5:302021-01-18T04:16:05+5:30

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट , माहूर , हदगाव ,हिमायतनगर तालुक्यात मका ,ज्वारी, धान खरेदी केंद्र ...

Toor registration shopping center in the district fixed | जिल्ह्यातील तूर नोंदणी खरेदी केंद्र निश्चित

जिल्ह्यातील तूर नोंदणी खरेदी केंद्र निश्चित

Next

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट , माहूर , हदगाव ,हिमायतनगर तालुक्यात मका ,ज्वारी, धान खरेदी केंद्र सुरु करवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे . यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा तालुक्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, यासाठी नांदेड जिल्ह्यातील ८ ठिकाणी तूर नोंदणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत . खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहकारी खरेदी विक्री संघ म.हदगाव केंद्र चालक चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट आणि तालुका कृषी प्रक्रिया संस्था गणेशपूर येथे केंद्र चालक तिरमनवार ,विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अंतर्गत सरसम येथे सरसम ऍग्रो प्रोड्युसर कंपनी येथे केंद्र चालक दमकोंडवार तर इतर ठिकाणी महा फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत हदगाव तालुक्यातील तळणी,येथे तावडे फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक विजय लोखंडे , निवघा बाजार येथे शेवंतामाता फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक गजानन शिंदे, सरसम येथे पारडी रेणुका फार्मर कंपनी केंद्र चालक सदशिव पतंगे , किनवट येथे किनवट परिसर शेतकरी प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक श्रीकांत पुरेवार या ठिकाणी संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी. नोंदणी करिता खरीप हंगाम २०२०-२०२१ मधील पिकपेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन ७/१२ आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव खाते क्रमांक आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये) संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .

Web Title: Toor registration shopping center in the district fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.