अनाथ आश्रमातील मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:26+5:302021-03-01T04:20:26+5:30
मुदखेड येथील आस्था अनाथ आश्रमातून शुक्रवारी रात्री १४ आणि १६ वर्षीय दोन मुलींनी पलायन केले होते. त्यानंतर रेल्वेने ...
मुदखेड येथील आस्था अनाथ आश्रमातून शुक्रवारी रात्री १४ आणि १६ वर्षीय दोन मुलींनी पलायन केले होते. त्यानंतर रेल्वेने या दोन्ही मुली शनिवारी पहाटे किनवट रेल्वे स्टेशन येथे पोहोचल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. त्यांनी या दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आश्रमात मारहाण होत असल्याने पळाल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी लगेच ही माहिती मुदखेड पोलिसांनी दिली. मुदखेड पोलिसांनी शनिवारी रात्री किनवट येथून त्यांना मुदखेडला आणले. या ठिकाणी दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असता, १६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी अधीक्षक शिवाजी गुंटे याच्या विरोधात अत्याचार आणि पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची माहिती मिळताच गुंटे फरार झाला होता. परंतु पोलिसांनी काही तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या.