उपसा जोरात; विक्री मात्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:34 AM2019-06-26T00:34:24+5:302019-06-26T00:36:02+5:30

अवैध रेतीउपसा करणाऱ्या माफियांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी, रेती उपसा मात्र जोरात सुरु असल्याचे दिसून येते़ गोदावरीतील गाळ काढण्याबरोबर वाळूचाही उपसा करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, प्रशासनाने कलम १४४ लावलेले घाटही त्यातून सुटले नाहीत़

Tough loud; The sale however closed | उपसा जोरात; विक्री मात्र बंद

उपसा जोरात; विक्री मात्र बंद

googlenewsNext
ठळक मुद्देघाटावर १४४ कलम काही दिवसांपूर्वीच केली होती कारवाई

नांदेड : अवैध रेतीउपसा करणाऱ्या माफियांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी, रेती उपसा मात्र जोरात सुरु असल्याचे दिसून येते़ गोदावरीतील गाळ काढण्याबरोबर वाळूचाही उपसा करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, प्रशासनाने कलम १४४ लावलेले घाटही त्यातून सुटले नाहीत़
सध्या वाळूला सोन्याचा भाव आला आहे़ एक ब्रास वाळूसाठी साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत़ पावसाला झालेला विलंबही वाळूमाफियांच्या पथ्यावरच पडला असून सहा ब्रास क्षमतेची वाळूची एक हायवा घेण्यासाठी तब्बल चार हजार रुपये मोजावे लागत आहेत़ नांदेड शहरानजीक रहाटी, सोमेश्वर, भनगी, गंगाबेट या भागातून दिवसरात्र वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाने भनगी घाटावर कारवाई करुन दहा वाहनांना दंड ठोठावला होता़
परंतु त्या ठिकाणीही पुन्हा जेसीबीद्वारे वाळू उपसा सुरु आहे़ कलम १४४ लावलेले घाटही यातून सुटले नाहीत हे विशेष! वाळू माफियाकडून सध्या केवळ वाळू उपसा करुन त्याचा साठा करण्यात येत आहे़ प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन राजरोसपणे हा प्रकार सुरु आहे़ त्यामध्ये सर्वच पक्षांचे पुढारीही आता घुसले आहेत़ घाटावरुन रेती उपसा करु द्यावा यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात येत आहेत़ त्यामुळे अवैधपणे रेती उपसा सुरुच आहे़ अनेकांनी व्याजाने पैसे घेऊन रेती उपसा करण्यासाठी वाहने घेतली आहेत़
गोदाकाठच्या शेतात वाळूंचे ढिगारे
गोदावरीच्या दोन्ही बाजूंनी वाळू उपसा सुुरु असून वाळू माफिया शेजारी असलेल्या शेतामध्ये वाळूचा साठा करीत आहेत़ पाऊस लांबल्याने पेरणीला वेळ असून वाळू माफियांना मात्र त्याला लाभ झाला़ पावसाळा संपल्यानंतर रॉयल्टी फाडून पुन्हा ही वाळू विक्री केली जाते़ प्रशासनाने ड्रोनने या परिसराची तपासणी केल्यास मोठे वाळूसाठे सापडू शकतात़
भोकर तालुक्यातील दिवशी परिसरात वाळू उपसा जोरात सुरु आहे़ याबाबत स्थानिक नागरीकांनी तक्रारीही केल्या आहेत़ परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही़ अनेक शेतकºयांच्या शेतात वाळू साठे करुन ठेवले आहेत़ अशीच परिस्थिती नांदेड तालुक्यातही आहे़ सध्या भाव एक ब्रास वाळूसाठी साडेतीन हजार ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत़

Web Title: Tough loud; The sale however closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.