करंजी येथे ‘एक पाऊल कुपाेषणमुक्ती’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:37+5:302021-09-22T04:21:37+5:30
किनवट : तालुक्याच्या करंजी येथे पाेषण आहार सप्ताहांतर्गत ‘एक पाऊल कुपाेषणमुक्ती’कडे हा कार्यक्रम साेमवारी २० सप्टेंबर राेजी पार पडला. ...
किनवट : तालुक्याच्या करंजी येथे पाेषण आहार सप्ताहांतर्गत ‘एक पाऊल कुपाेषणमुक्ती’कडे हा कार्यक्रम साेमवारी २० सप्टेंबर राेजी पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे या कुपाेषण मुक्तीसाठी आग्रही आहेत. त्यातूनच कुपाेषण मुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. इस्लापूर विभाग क्रमांक २ अंतर्गत माैजे करंजी येथे कुपाेषणमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच पद्मीनबाई जाधव तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य निर्मला काेल्हेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षिका ताई गुट्टे उपस्थित हाेत्या. सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपाेषण मुक्तीसाठी चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व याेजनांची माहिती देण्यात आली. किनवट येथील बालविकास प्रकल्प अधिकारी ए. एस. ठकराेड यांच्या संकल्पनेतून व पर्यवेक्षिका जना घुमे-गाेटमवाड यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इस्लापूर बीट-२ च्या पर्यवेक्षिका जना घुमे-गाेटमवाड यांनी केले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व मदतनीस माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.