नांदेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:42 PM2020-02-10T16:42:59+5:302020-02-10T16:43:39+5:30

पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीला लाथ मारली

Traders Rs 30 lakh looted on gun point in Nanded | नांदेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये लंपास

नांदेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये लंपास

Next
ठळक मुद्देनांदेडमध्ये फळ व्यापाऱ्यांना लुटले

नांदेड  - फळ व्यापाऱ्यांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवीत ३० लाख रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. 

शहरातील माळ टेकडी भागात असलेल्या फळ मार्केट येथून मोहम्मद साजिद मोहम्मद हसन व शेख मुद्दसिर हे दोघे जण ३० लाख रुपये घेऊन दुचाकीवरून निघाले होते. तारासिंग  मार्केट भागातील बँकेत त्यांना हे पैसे जमा करावयाचे होते. दुचाकीवरून ते सामाजिक न्याय भवन जवळ आले असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोहम्मद साजिद यांच्या दुचाकीला लाथ मारली त्यामुळे तोल जाऊन दोघेही खाली पडले. त्याचवेळी आरोपीने त्यांच्या हातातील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद साजिद यांनी त्यांना विरोध केला. 

यानंतर एका आरोपीने तलवार काढली तर दुसऱ्याने  व्यापाऱ्यांच्या दिशेने बंदूक रोखली. त्यानंतर ३० लाख रुपये असलेली ही बॅग घेऊन आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Traders Rs 30 lakh looted on gun point in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.