‘कोंढ्याने’ जपली सामूहिक विवाहाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:11 AM2018-05-08T01:11:34+5:302018-05-08T01:11:34+5:30

लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

The tradition of collective marriages of 'conspiracy' | ‘कोंढ्याने’ जपली सामूहिक विवाहाची परंपरा

‘कोंढ्याने’ जपली सामूहिक विवाहाची परंपरा

Next
ठळक मुद्देउपक्रमाची २९ वर्षे : मुलींचा विवाह अंगणातच थाटामाटात पडतोय पार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
सोमवारी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासूनच कोंढ्याच्या दिशेने वºहाडींची गर्दी दिसत होती. सकाळी १०.१७ चा मुहूर्त होता. विवाह सोहळ्यासाठी गावात भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. हा मंडप वºहाडींच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटेपासूनच गावातील तरूणांबरोबरच आबालवृद्ध विवाह सोहळ्याच्या लगबगीत होते. मुहूर्तावर हजारो वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सुमारे २० हजारांवर वºहाडींच्या भोजनाच्या पंगती पडू लागल्या. विवाहासाठी एवढी गर्दी असतानाही ग्रामस्थांच्या अचूक नियोजनामुळे कुठेही, कसलीही कमतरता नव्हती.
या सोहळ्यासंदर्भात सांगताना गावातील ज्येष्ठ संभाजी पाटील कोंढेकर म्हणाले, विवाह सोहळ्यावेळी मुलीच्या वडिलांवर आर्थिक ताण येतो. अनेकजण कर्जबाजारी होतात, हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. या हेतूने २९ वर्र्षांपूर्वी कोंढा ग्रामस्थांनी एकत्रित येवून गावातील मुलींचे विवाह सामूहिक सोहळ्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी हरिभाऊ कदम, रामराव कोंढेकर, दादाराव कोंढेकर, गणेश कोंढेकर, बबन कोंढेकर, बाबूराव कोंढेकर यांच्यासह गावातील अनेकांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून गावातील बहुतांश मुलींचे विवाह या सोहळ्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या विवाह सोहळ्यात सुमारे २० विवाह होतात. याची तयारी दीड ते दोन महिने अगोदरच ग्रामस्थ करीत असतात. विवाहसोहळ्यासाठी नावनोंदणी केलेल्या वधूपित्याकडून त्याच्या ऐपतीप्रमाणे २ ते हजारांपासून ५० हजार रूपयांची रक्कम घेतली जाते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या अनेक मुलींचे विवाह या सोहळ्यात पायलीभर गव्हावर थाटा-माटात पार पडल्याचेही कोंढेकर यांनी सांगितले.

सामूहिक सोहळा असला तरी, यात वºहाडींची व्यवस्था करण्यामध्ये ग्रामस्थ कुठेही कमी नव्हते. सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. याबरोबरच भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २० ते २५ हजार वºहाडींना थंड बाटलीबंद पाणी पुरविण्यात येत होते. यासाठी सहा ट्रॅक्टर भरून पाण्याच्या बाटल्या विवाहस्थळी सज्ज होत्या.त्याचप्रमाणे मंडपातील नागरिकांना विवाह सोहळा पाहता यावा, यासाठी ठिकठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.

सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या कोंढा गावात सोमवारी १६ जोडप्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. विवाह सोहळ्यासाठी परिसरातील विविध गावांतून २० ते २५ हजार वºहाडींची उपस्थिती होती. त्यामुळे गावात जिकडे-तिकडे वºहाडींची वर्दळ दिसून येत होती. वधूपित्यांच्या घरासमोर मंडप टाकलेले होते. या मंडपात रूखवाताच्या सामानासह पै- पाहुण्यांची गर्दी होती. विवाह सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी सुमारे दोन हजारांवर ग्रामस्थ कार्यरत होते.मोठ्या संख्येने वºहाडी असताना सोहळ्यात कसलीही कमतरता जाणवत नव्हती.

Web Title: The tradition of collective marriages of 'conspiracy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.