नांदेड शहरात वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:35 AM2018-07-18T00:35:36+5:302018-07-18T00:37:40+5:30
मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़
तरोडा नाका ते पोलीस अधीक्षक कार्यालय हा शहरातील मुख्य रस्ता आहे़ नेदरलँडच्या धर्तीवर शहरातील रस्ते उभारण्यात आल्याने सायकल ट्रॅक, फुटपाथसह दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग पोर्च उभारण्यात आला आहे़ परंतु, त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे़ शहरातील तरोडा नाका, वर्कशॉप, कलामंदिर आणि देगलूर नाका चौकात सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे़ यात भाजीपाला, फळविके्रते तसेच दुकानदारांनी फुटपाथ ताब्यात घेवून दुकान मांडले आहे़ अतिक्रमणाकडे महापालिका अधिकारी कानाडोळा करीत असल्याने या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे़ त्यात मागील रिमझिम पावसाने मोकाट जनावरे आपले बस्तान मुख्य रस्त्यावर मांडत आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन मार्गस्थ करावे लागत आहे़
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी ६ जुलैपासून रिक्षाचालकांना गणवेश अनिवार्य करून शिस्तीचे धडे दिले जात आहेत़ तर विनाक्रमांक, दादा, मामा, बॉस अशा स्टाईलमध्ये वाहन क्रमांक टाकणाऱ्या वाहनांसह स्टटंबाजावर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे़ परंतु, आजही बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागलेली नाही़
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस शाखा यांनी संयुक्तपणे मोहीम राबविणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर नांदेडकरांनी नियमितपणे सिग्नल आणि वाहतूक नियम पाळण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेण्याची वेळ आली आहे़
कलामंदिर भागात बसस्थानक, डॉक्टरलेन असल्याने नागरिकांची अधिक वर्दळ असते़ रिक्षा रस्त्यावर उभी करून प्रवासी भरले जातात़ त्यातच वळण रस्ता घेवून बसस्थानक आणि डॉक्टरलेनमध्ये जाणाºया वाहनधारकांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे़
---
प्रशासनापुढे आव्हान
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रिक्षाथांबे निश्चित करून बोर्ड लावणे, चौक, फुटपाथचे अतिक्रमण काढणे, सिग्नलव्यवस्था सुरळीत ठेवणे, काही ठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण करणे़