मुदखेडमध्ये श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:09 AM2018-12-26T00:09:59+5:302018-12-26T00:10:41+5:30
नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानक व रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा विभागाचे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक तथा कमांडंट सचिन वेणू देव यांनी नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत रेल्वे सुरक्षेसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या असून श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी करण्यात येत आहे़
मुदखेड : नांदेडरेल्वे डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानक व रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा विभागाचे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक तथा कमांडंट सचिन वेणू देव यांनी नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत रेल्वे सुरक्षेसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या असून श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी करण्यात येत आहे़
नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार नुकताच सचिन वेणू देव यांनी घेतला. सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत़ त्यात नुकतेच त्यांनी सिकंदराबाद येथून रेल्वे सुरक्षा दलाची विशेष कंपनी बोलावली आहे़ या कंपनीत एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व ९० सुरक्षा जवान असा ताफा नांदेड रेल्वे सुरक्षेसाठी तैनात झाला आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे़ ही रेल्वे सुरक्षा बलाची विशेष कंपनी मुदखेड येथील सीआरपीएफ केंद्राच्या जांभळी फायरिंग केंद्रामध्ये वार्षिक प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे़
दररोज नांदेड रेल्वेस्थानक, मुदखेड रेल्वेस्थानक व देवगिरी एक्स्प्रेससह प्रमुख रेल्वेगाड्या तपासण्यात येत आहेत. तसेच कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
नांदेड डिव्हिजन रेल्वेचे कमांडंट सचिन वेणू देव यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक नांदेड तपासणी करीत आहे. मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्वानपथकाच्या माध्यमातून मुदखेड रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यात आली. बोरीस या सहा वर्षीय श्वानाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. या श्वानपथकामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक ए. आर. मगर व मारुती नवाडे यांचा समावेश आहे.
नांदेड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत केली वाढ
नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणा-या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे नांदेड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे़ या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून दिवस अन् रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारेही हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे़