ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:23+5:302021-01-09T04:14:23+5:30
येथे ८ रोजी पार पडले. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उर्मिला कुलकर्णी ...
येथे ८ रोजी पार पडले. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उर्मिला कुलकर्णी व सारंग चव्हाण नायब तहसीलदार निवडणूक उपस्थित
होते.
तहसीलदार किरण अंबेकर म्हणाले , दुसरे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष
मतदान प्रक्रियेतून दिले जाणार आहे.या माध्यमातून मतदानाच्या दिवशी केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी पार
पाडावी आणि आलेल्या विविध समस्यांना कसे तोंड द्यावे हे प्रत्यक्ष प्रशिक्षण पीठावर दाखविण्यात
येणार आहे. त्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुका या
संवेदनशील असतात. त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक प्रशिक्षण अत्यंत जबाबदारीने घेणे
आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत. नांदेड
तालुक्यात एकूण ७३ पैकी ६५ ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी २५३
मतदान केंद्रे उभारली असून ज्या मतदान केंद्रावर ८०० पेक्षा जास्त मतदार आहेत,त्या मतदान केंद्राचे
रुपांतर दोन मतदान केंद्रात केले आहे. नांदेड तालुक्यात कमाल मतदार ८६० एका केंद्रावर असून मतदान
घेणे सोपे व्हावे म्हणून सर्व व्यवस्था चोखपणे तयार करण्यात आली आहे.किमान मतदार असलेले केंद्र
२०० ते ३०० मतदाराचे आहे. यासाठी वाहन,पोलीस व्यवस्था,रुट गाईड,या सर्व व्यवस्था अत्यंत
बारकाईने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास
होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याप्रसंगी प्रत्येकांनी निवडणुकीचे कार्य जबाबदारीने पूर्ण करावे जर
निवडणुकीच्या कामात टाळाटाळ,निष्काळजीपणा कोणी करत असतील तर त्यांच्याविरुद्ध निवडणूक
कायद्याने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अंबेकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.