नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:09+5:302020-12-04T04:49:09+5:30

नांदेेड : दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातून हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय ...

Trains will run from Nanded division to Shirdi, Ajmer | नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

googlenewsNext

नांदेेड : दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातून हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

हैदराबाद - जयपूर (०७०२०) साप्ताहिक विशेष गाडी ५ डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल. जयपूर-हैदराबाद (०७०१९) साप्ताहिक विशेष गाडी ८ डिसेंबरपासून दर मंगळवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड मार्गे हैदराबाद येथे सकाळी साडेसात वाजता पोहोचेल.

सिकंदराबाद-श्री साईनगर शिर्डी (०७००२) द्वी-साप्ताहिक विशेष गाडी ४ डिसेंबरपासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवार आणि रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद(०७००१) द्वी-साप्ताहिक विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी आणि सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल. काकिनाडा- श्री साईनगर शिर्डी (०७२०६) त्रि-साप्ताहिक विशेष गाडी काकिनाडा रेल्वे स्थानकावरून ५ डिसेंबरपासून दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल, राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी - काकिनाडा (०७२०५) त्रि-साप्ताहिक विशेष गाडी श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून ६ डिसेंबरपासून दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल, औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वाजता पोहोचेल. तिरुपती-अमरावती (०२७६५) द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. या गाडीला १ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी १ डिसेंबरपासून तिच्या बदलेल्या वेळेप्रमाणे धावेल. ही गाडी १ डिसेंबरपासून तिरुपती येथून दुपारी ३.४० वाजता सुटेल आणि काचीगुडा-४ वाजता, निझामाबाद-६.५०, नांदेड -८.५१, पूर्णा-९.४०, अकोला-१.४५ वाजता मार्गे अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. अमरावती ते तिरुपती(०२७६६) द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी सुटेल. या गाडीला ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत वाढ दिली आहे. ही गाडी ३ डिसेंबरपासून अमरावती येथून बदललेल्या वेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता सुटेल, अकोला-८.२०, पूर्णा-११.५०, नांदेड -१२.२५, निझामाबाद मार्गे काचीगुडा ५.५० पेुेढे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५वाजता पोहचेल.

Web Title: Trains will run from Nanded division to Shirdi, Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.