नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:16+5:302020-12-04T04:49:16+5:30

हैदराबाद -जयपूर (०७०२०) साप्ताहिक विशेष गाडी ५ डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, ...

Trains will run from Nanded division to Shirdi, Ajmer | नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

नांदेड विभागातून शिर्डी, अजमेरसाठी धावणार रेल्वे

Next

हैदराबाद -जयपूर (०७०२०) साप्ताहिक विशेष गाडी ५ डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल. जयपूर-हैदराबाद (०७०१९) साप्ताहिक विशेष गाडी ८ डिसेंबरपासून दर मंगळवारी जयपूर रेल्वेस्थानकावरून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेडमार्गे हैदराबाद येथे सकाळी साडेसात वाजता पोहोचेल.

सिकंदराबाद-श्री साईनगर शिर्डी (०७००२) द्वी-साप्ताहिक विशेष गाडी ४ डिसेंबरपासून सिकंदराबाद रेल्वेस्थानकावरून दर शुक्रवार आणि रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद (०७००१) द्वी-साप्ताहिक विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी श्री साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरून दर शनिवारी आणि सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीरमार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल. काकिनाडा- श्री साईनगर शिर्डी (०७२०६) त्री-साप्ताहिक विशेष गाडी काकिनाडा रेल्वेस्थानकावरून ५ डिसेंबरपासून दर सोमवारी बुधवारी आणि शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल, राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे श्री साईनगर शिर्डी सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी-काकिनाडा (०७२०५) त्री-साप्ताहिक विशेष गाडी श्री साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरून ६ डिसेंबरपासून दर मंगळवारी-गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल, औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वाजता पोहोचेल. तिरुपती-अमरावती (०२७६५) द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. या गाडीला १ ते २९ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी १ डिसेंबरपासून तिच्या बदललेल्या वेळेप्रमाणे धावेल. ही गाडी १ डिसेंबरपासून तिरुपती येथून दुपारी ३.४० वाजता सुटेल आणि काचीगुडा-४ वाजता, निझामाबाद-६.५०, नांदेड -८.५१, पूर्णा-९.४०, अकोला-१.४५ वाजता, अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. अमरावती ते तिरुपती (०२७६६) द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी सुटेल. या गाडीला ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी ३ डिसेंबरपासून अमरावती येथून बदललेल्या वेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता सुटेल, अकोला-८.२०, पूर्णा-११.५०, नांदेड -१२.२५, निझामाबादमार्गे काचीगुडा ५.५० पुढे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५वाजता पोहोचेल.

Web Title: Trains will run from Nanded division to Shirdi, Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.