३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:01+5:302021-02-13T04:18:01+5:30

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात ...

Transport of 19 tons of onion in 38 days | ३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

Next

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. नगरसूल येथून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली.

नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणांहूनही किसान रेल्वे सुरू करण्याकरिता संबंधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. शेतमाल वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालविण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या ५० किसान रेल्वेमधून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून यावर्षी मार्च महिनाअखेरीस आणखी ५० किसान विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणांकरिता आणखी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वेगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.

दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरू करण्याकरता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी किसान विशेष रेल्वेकरता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वेमंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढविण्यात हातभार लावावा.

Web Title: Transport of 19 tons of onion in 38 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.