कोरोनाकाळातही २३७ कुपोषित बालकांवर केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:14+5:302021-02-26T04:24:14+5:30
नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस महत्त्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षात बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत ...
नवजात बालकांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस महत्त्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षात बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे वयाच्या मानाने उंची, उंचीच्या मानाने वजन योग्य असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावर प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. कुपोषणमुक्तीसाठी २००५ मध्ये स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ माता बालआरोग्य व पोषण मिशनमार्फत माता सक्षमीकरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी ग्राम बालविकास केंद्र हा उत्तम पर्याय ठरत असून, याअंतर्गत सॅम व मॅम या घटकात मोडणाऱ्या बालकांवर उपचार केले जात आहेत.
चौकट- मागील वर्षी कोरोनाकाळात २३७ कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले. कोरोनासोबत लढतानाच आमच्या अंगणवाडी ताई, सुपरवायझर, सीडीपीओ, डेप्युटी सीईओ कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करत होते. कुपोषित बालकांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे, वजन घेणे, पोषण आहार देणे ही कामे काळजीपूर्वक करण्यात आली. - शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड