नांदेड जिल्ह्यात आदिवासी गावे ‘पेसा’ पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:09 AM2018-08-20T01:09:32+5:302018-08-20T01:10:20+5:30

आदिवासीबहुल गावे पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) मध्ये अद्यापही समाविष्ट करण्यात आली नसल्याने पेसा निधीपासून ती गावे अजूनही दूर आहेत. अशी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे़

Tribal villages in Nanded district are deprived of 'Pisa' | नांदेड जिल्ह्यात आदिवासी गावे ‘पेसा’ पासून वंचित

नांदेड जिल्ह्यात आदिवासी गावे ‘पेसा’ पासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्दे२०११ च्या जनगणनेनुसार आदिवासी गोंड जातीची लोकसंख्या ५६२ असूनही पेसात समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : आदिवासीबहुल गावे पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) मध्ये अद्यापही समाविष्ट करण्यात आली नसल्याने पेसा निधीपासून ती गावे अजूनही दूर आहेत. अशी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे़
आदिवासी उपयोजना क्षेत्रात टीएसपीअंतर्गत येणारे बुधवारपेठ हे गाव अद्यापही पंचायत विस्तार क्षेत्र कायदा १९९६ पेसामध्ये समाविष्ट केलेले नाही़ पन्नास टक्के पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावे ही पंचायत क्षेत्र विस्तार अधिनियमात मोडतात. बुधवारपेठ गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार एकूण ५८२ असून अनु़जमाती (आदिवासी गोंड) जातीची लोकसंख्या ही ५६२ आहे व २० इतर आहेत असे असतानाही हे गाव पेसात नाही़
याशिवाय तालुक्यातील पाटोदा मरकागुडा व सालाईगुडा यासह अन्य काही आदिवासी गावे पेसा कायद्यापासून वंचित असल्याची माहिती आहे़ याबाबत पं.स.चे विस्तार अधिकारी लतीफ यांना विचारले असता, बुधवारपेठ या गावाचा पेसामध्ये समावेश करण्यात यावा म्हणून प्रस्ताव पाठविला आहे असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ मागणी करूनही कित्येक वर्षे लोटली तरी आदिवासी गावे पेसापासून दूर असल्याने प्रस्ताव पाठवूनही तो कुठे धूळखात पडला असावा? तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारपेठ हे गाव स्वतंत्र महसुली गाव असून स्वतंत्र ग्रामपंचायत आहे़
सदर गावाचा समावेश आदिवासी उपयोजना क्षेत्रात (टीएसपी) असल्यामुळे हे गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात येत आहे़ असे पेसाअंतर्गत एकूण ग्रामपंचायती अंतर्गत पूर्वी घोषित व नवीन घोषित करावयाच्या गावांची यादी या २०१६ च्या यादीमध्ये स्पष्ट असतानाही हे गाव पेसात न आल्याने कुठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही़
जी गावे टीएसपीमध्ये आहेत; पण ती पेसात नाहीत, अशा गावांचा पेसामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी होत आहे़

बुधवारपेठ ग्रामपंचायतीचा प्रस्ताव लालफितीत
बुधवारपेठ या आदिवासी ग्रामपंचायतीचा पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी उपसरपंच ज्ञानदेव पुरके यांनी तीन वर्षांपूर्वी करूनही प्रस्ताव आजही लालफितीत अडकून पडला आहे़ आदिवासी गाव असतानाही या गावाचा समावेश पेसामध्ये न झाल्याने विकास निधीपासून हे गाव वंचित आहे़ बुधवारपेठ गावाचा समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे़

Web Title: Tribal villages in Nanded district are deprived of 'Pisa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.