जमादार यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:31 AM2021-02-06T04:31:31+5:302021-02-06T04:31:31+5:30
लसीकरण मोहीम धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोलीस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ.माया निखाते ...
लसीकरण मोहीम
धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोलीस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ.माया निखाते यांनी बालकांना डोस दिला. यावेळी कुलकर्णी, सोनाली वाघमारे, शांताबाई कमलाकर, संगीता मुडलोड, डॉ.राहुल कांबळे, लोंढे, वर्षा मुपडे आदी उपस्थित होते.
भाजपात प्रवेश
किनवट - तालुक्यातील मलकजांब तांडा येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गणपतराव राठोड यांनी भाजपात प्रवेश घेतला. माजीमंत्री डी.बी. पाटील, आ.भीमराव केराम आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
पाळेकर सेवानिवृत्त
उमरी - गोळेगाव येथील सहाय्यक पशूवैद्यकीय अधिकारी एम.एस. पाळेकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना गावकऱ्यांनी निरोप दिला. यावेळी गोविंदराव पाटील, सोनबाराव सोनावणे, कांबळे, दूबे, इपलपल्ली, पी.बी.मिरेवाड आदी उपस्थित होते.
सांगळे यांची भेट
मुक्रमाबाद - देगलूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी ३ फेब्रुवारी रोजी मुक्रमाबाद पोलीस स्टेशनला भेट देवून पाहणी केली. त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी सपोनि कमलाकर गड्डीमे, बीटचे पोलीस जमादार उपस्थित होते.
दुचाकी लंपास
लोहा - तालुक्यातील हरसन येथून दुचाकी लांबविल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद कोल्हे यांची एम.एच.२६-ए.ई.६९५७ या क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. सोनखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
तालुकाध्यक्षपदी पाटील
धर्माबाद - तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी साईनाथ पाटील तर सचिवपदी नारायण सोनटक्के यांची निवड झाली. कोषाध्यक्ष बळीराम सूर्यवंशी, सहसचिव जीवन चव्हाण, महिला उपाध्यक्ष सावित्राबाई बोलचटवार, माधव पांचाळ आदींचा समावेश आहे.
लुंगारे यांची फेरनिवड
कंधार - येथे साजरी होणाऱ्या सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी धनराज पाटील लुंगारे यांची फेरनिवड झाली. यावेळी परमेश्वर जाधव, बळीराम पवार, उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे, सतीश नळगे, सुंदरसिंग जाधव, राजकुमार केकाटे, शहाजी पाटील उपस्थित होते.
जाधव यांना पुरस्कार
हिमायतनगर - तालुक्यातील कौठा ज. येथील लवकुश जाधव यांना नेहरू युवा केंद्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छता, आरोग्य आणि आहार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
लसीकरणाचा शुभारंभ
मुदखेड - येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सीआरपीएफचे कमांडंट लीलाधर महाराणीया, नगराध्यक्ष मुजीब जहागीदार, माधव कदम, नगरसेवक संजय आऊलवार, बालाजी गोडसे आदी उपस्थित होते.